अलीकडच्या काळात विविध कार्यक्रमानिमित्त तसेच अनेक मंडळामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतो. आटपाडी शहरातील एसटी स्टँड नजीक कोष्टी गल्ली येथे क्रांती नवरात्र उत्सव व शिव जन्मोत्सव सोहळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला.
शिवजन्मोत्सव दिवशी पहाटे बानुरगढ येथील बहिर्जी नाईक यांच्या समाधी स्थळावरून ज्योत आणण्यात आली रक्तदानाने शिवरायांना वंदन करून क्रांती मंडळाच्या सदस्याने उपक्रम राबविल्याचे मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी उपस्थित माजी समाज कल्याण नितीन खटावकर, बादल दौंडे, बाळू लाटणे सभापती ब्रह्मानंद पडळकर, युवा नेते सौरव, रमेश लाटणे, समर्थ रसाळ, सुरज जाधव, पाटील आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेंद्र लखन दौंडे रवी कलढोणे, गुरुप्रसाद खरात उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला.