खरीप व रब्बी हंगामातील काढणीनंतर केलेल्या भाजीपाल्याची आवक आटपाडी तालुका आठवडा बाजारात चांगली होत आहे. तसेच इतर ग्रामीण भागातील करगणी, खरसुंडी, दिघंची, माडगुळे आदी परिसरातील मात्र अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्याने भाजी उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
उन्हामुळे फळांची मागणी वाढत असून आंबा अद्यापी सामान्याच्या आवाक्याबाहेर आहे. लिंबास मागणी वाढली असून प्रति लिंबू दहा रुपये ते बारा रुपयांना विकला जात आहे. कांद्याची आवक वाढल्याने दर ढासळले आहेत. प्रति किलो १५ ते २० रुपये दर आहे. उन्हाचा तडाखा वाढत असला तरी बाजारात भाज्यांची आवक वाढत आहे. मात्र ग्राहक कमी असलेची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. टोमॅटोचे दर घसरल्याने आटपाडी तालुक्यातील शेतकरी अस्वस्थ झाले असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.