दिघंचीमधील पानपोई झाल्या कालबाह्य!

सध्या उन्हाची झळ खूपच वाढत चाललेली आहे. पाण्याची टंचाई देखील जाणवत आहेत. उन्हाळ्यात तहानलेल्यांची तहान भागवण्यासाठी पूर्वी अनेक ठिकाणी दानशूर व्यक्ती सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते जागोजागी माठात अथवा रांजणात रस्त्याकडेला पाणपोई उभा करत होते.

मात्र, आता पाणपोई कालबाह्य होऊ लागल्या आहेत. थंडगार पाण्याचे जार पाणपोईची जागा घेत आहेत, त्यामुळे पाणपोई दुर्मीळ झाल्या आहेत. शहरातील बसस्थानक परिसर, बाजारपेठ, मुख्य चौक यासह रहदारीच्या ठिकाणी मोठ मोठे रांजण ठेवून त्यावर लाकडी झाकण व रांजणाभोवताली ओला कपडा गुंडाळून व त्यावर ग्लास असलेल्या पाणपोई दिसायच्या. पूर्वीच्या काळी असलेल्या पाणपोई आता दुर्मीळ होत चालल्या आहेत.