सध्या अनेक भागात विविध कार्यक्रमानिमित्त अनेक स्पर्धा, तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आष्टा शहरामध्ये भव्य घोडागाडी शर्यती आज बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता आष्टा माळ येथे आयोजित केल्याची माहिती सोजकांनी दिली यावेळी ते म्हणाले आष्टा शहराचे सुपुत्र माजी आमदार स्व विलासराव शिंदे जयंतीनिमित्त घोडागाडी शर्यतीचे आयोजन केले आहे.
प्रथम क्रमांक पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये, तृतीय क्रमांक दोन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे यावेळी मैदान करेक्ट आणि रस्त्यातच होणार आहे मैदानात गाडीमागे व्हीलर लावल्यास गाडी कॅन्सल करण्यात येईल. कमिटीचा निर्णय अंतिम राहील मैदान १००% होणार असुन वशिला चालणार नाही यावेळी वैभव दादा शिंदे युवा मंच वतीने या शर्यतीचे नियोजन करण्यात आले आहे.