प्रत्येक भागात काही ना काही अडचणी या असतात. त्या दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील केला जातो. सध्या अनेक सेवा सुविधा या प्रत्येक भागात होऊ लागल्याने जनतेतून समाधान देखील व्यक्त होत आहे. सध्या आष्टा शहरात देखील अनेक विकासकामे सुरु आहेत. यामध्ये आणखी एक भर पडली आहे.
आष्टा येथील सह्याद्री मल्टीपर्पज लॉनचे उद्घाटन माजी मंत्री जयंतरावजी पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मा.जयंत पाटीलसाहेब लोकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन दिपक मेथेपाटील यांनी आष्टा या ठिकाणी २५ हजार स्क्वेअर फुट एरियामध्ये सुसज्ज असे सह्याद्री मल्टीपर्पज लॉन उभे केले आहे. आता आष्टा व परिसरातील लोकांना दूर जाण्याची गरज भासणार नाही ही सर्व व्यवस्था आष्टा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे.
जवळपास हजार ते दीड हजारांपेक्षा जास्त खुर्च्या बसतील एवढे प्रशस्त लॉन एरिया आहे. शिवाय स्टेज तसेच २३० मीटरचा वॉकिंग ट्रॅक उपलब्ध करून दिलेला आहे. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे या लॉन व्यवस्था केलेली आहे आष्टा शहरांमध्ये अशा प्रकारचे खुल्या जागेत सर्व कार्यक्रम होण्यासाठी लॉनची आवश्यकता होती ती दीपक यांनी गरज ओळखून आपल्या शेत जमिनीमध्ये लॉनची व्यवस्था पूर्ण केली आहे याचा लोकांनी लाभ घ्यावा अशी विनंती केली.
वैभव दादा शिंदे यांनी बोलत असताना दीपक हे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत होते ते ह्य क्षेत्रामध्ये येतील असे वाटत नव्हते पण त्यांनी आपल्या शेत जमिनीचा योग्य वापर करून लोकांची गरज ओळखून ही लॉनची व्यवस्था अतिशय चांगली केली आहे असे मत व्यक्त केले.