आटपाडी नगरपंचायत कर्मचारी यांचा अपघाती मृत्यू, शहरात हळहळ

अलीकडच्या अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहेच.आटपाडी नगरपंचायत कर्मचारी प्रभाकर विष्णू भोसले वय ५० नगरपंचायतचे कामकाज बजावत असताना क्लूझर या चार चाकी गाडीची कर्मचारी यास धडक बसल्याने डोक्यास जबर दुखापत झाली. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. आज पर्यंत आटपाडी ग्रामपंचायत ते नगरपंचायत प्रामाणिक सेवा बजावणारे कर्मचारी म्हणून आटपाडी शहरात त्यांची ओळख होती. घटना समजतात आटपाडी नगरपंचायत मुख्य अधिकारी वैभव हजारे तातडीने दवाखान्यात पोहोचले. त्यांच्या या दुःखद घटनेमुळे आटपाडी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.