स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पाठपुराव्यातून साकारलेले श्री रेवेनसिद्ध भक्त निवास या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ तसेच लोकार्पण सोहळा राज्याचे पर्यटन मंत्री मा. ना.शंभूराजे देसाई साहेब तसेच खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे आमदार सुहासभैया बाबर त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अमोलदादा बाबर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम बुधवारी श्री रेवणसिद्ध मंदिर येथे संपन्न होत आहे.
बुधवार म्हणजे 26 फेब्रुवारीपासून श्री रेवणसिद्ध देवाची यात्रा सुरू होणार आहे. 26 महाशिवरात्रीला तसेच 27 तारखेला अमावस्येच्या दिवशी भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच शुक्रवारी म्हणजेच 28 फेब्रुवारीला जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.