हुपरीतील चांदी व्यावसायीकांत संभ्रमावस्था

हुपरी शहरातील नामांकित असलेल्या चांदी कारखानदार असोसिएशन मध्ये शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील विटा येथे घडलेल्या बनावट पाटला प्रकरणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, टंचफॉर्म बाबतीत ठोस भूमिका दिसली नाही. यामुळे चांदी उद्योजकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.प्रत्येक वेळी चांदी व्यवसायाला चुकीच्या पद्धतीने गालबोट लावत असून यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अशी मागणी करण्यात आली आहे. बनावट पाटला प्रकरण यामुळे चांदी व्यावसायाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातून असोसिएशन कडक भूमिका घेईल अशी उद्योजकांची अपेक्षा होती.

पार पडलेल्या असोसिएशन बैठकीत कठोर उपाययोजना करण्याची अपेक्षा बाळगून आलेल्या उद्योजकांची घोर निराशा झाली आहे. संस्थापक स्व. य. रा. नाईक आण्णा यांच्या विचारांचा सन्मान करुन निरपेक्ष वृत्तीने काम करण्याची गरज आहे. तरच अशा घटनांना आळा बसेल अन्यथा भविष्यात हपरी शहरातील उद्योजकांची परप्रांतीय बाजारपेठ मध्ये कोंडी होईल असे चित्र दिसत आहे.तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीअंती लोकांच्या मतांवर निर्णय न घेता असो. ने पडताळणी करून सत्यतथ्य तपासून निर्णय घेतला तर अशा गंभीर प्रकरणांना आळा बसेल अन्यथा अशा प्रवृत्ती फोफावत जातील आणि दिवसेंदिवस व्यावसायिक अडचणीत वाढ होईल अशी प्रतिक्रिया धडी उत्पादक संघटना अध्यक्ष राजू हांडे यांनी दिली.