सांगोला तालुक्यातील तिप्पेहळी येथे चोरट्याने पवनचिक्कीच्या टान्सफॉर्मरची ३५ हजार रुपये किमतीची तांब्याची वायर चोरून नेल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली आहे. संतोष शिंदे हे आदित्य सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीमध्ये सिक्युरिटी म्हणून काम करतात. ते कंपनीमार्फत तिप्पेहळळी, महादेव डोंगर घाटनाद्रे, जरंडी, वाघोली, कुंडलापूर, बिरनवाडी साईटवर सिक्युरिटी गार्ड, सुपरवायझर यांच्यावर देखरेखचे काम करतात.
सुझलॉन कंपनीचे पवन चक्कीचे काम पाहतात त्यांना २१ फेब्रुवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास सुजलॉन कंपनीचे इंजिनिअर आण्णासाहेब सोलनकर यांचा फोन आला की, तिप्पेहाळी हद्दीतील पवनचक्की नंबर एन २४ या पवन चक्कीचे ट्रान्सफार्मरचे चोरीस गेले आहेत, सांगितल्याने फिर्यादी व सोबत सिक्युरिटी गार्ड व वाहन चालक असे घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पवनचक्कीच्या ट्रान्सफॉर्मरची तांब्याची वायर गायब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत संतोष शिंदे यांनी चोरट्याने पवनचक्कीच्या ट्रान्सफॉर्मरची ३५ हजाराची ८५ मीटर लांबीची तांब्याची वायर चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.