आटपाडीत शासकीय विभागांची आ. सुहास बाबरांकडून आढावा

आटपाडी तालुक्यातील सुरु असलेल्या विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा शासकीय बैठकीत आ. सुहास बाबर यांनी घेतला. राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणा-या विविध बाबीवर धोरणात्मक चर्चा करण्याच्या दृष्टीने आयोजित आढावा बैठकीप्रसंगी शासकीय अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांशी संवाद आ. सुहास बाबर यांनी साधला. याप्रसंगी पायाभूत सुविधा, विविध क्षेत्रातील प्रकल्प आणि योजजनांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत जनतेच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून तसेच तातडीने उपायोजना करण्यासाठी संबंधित अधिका-यांना आदेश देण्यात आले. नागरिकांना सुविधांचे मजबुतीकरण, शेती, उदयोग विकास तालुक्याच्या समृध्दीसाठी राबवायच्या नव्या उपक्रमांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील, प्राताधिकारी विक्रम बांदल, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी भंडारे, कार्यकारी अभियंता विनायक  इदाते, विविध विभागाचे खाते प्रमुख उपस्थिती होते.