इस्लामपुर येथे शिवीगाळ केल्याच्या रागातून एकावर चाकुने हल्ला

शिवीगाळ व मारहाण केल्याच्या रागातून सुरज सुभाष जाधव यांच्यावर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी संशयीत बंदेनवाज शब्बीर मुल्ला उर्फ बंडा याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवार दि. २७ रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. जखमी सुरज जाधव व त्याचा मित्र रोहित तावरे हे डायमंड पान शॉप येथे गुरूवारी रात्री ८ च्या सुमारास गेले होते. त्यावेळी संश आरोपी बंदेनवाज मुल्ला याने बारच्या बाहेर झालेली मारहाण व शिवीगाळीचा राग मनात धरून सुरज जाधव यांच्या पोटावर व कंबरेवर चाकुने वार करून गंभीर जखमी केले. याबाबतची फिर्याद सुर जाधव यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.