महाविकास आघाडीकडून राहुल महाडिक यांची चाचपणी पॉलिटिकल वॉरअशोक पाटील इस्लामपूर हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडणुकीपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शड्डू ठोकला आहे. त्यांच्याविरोधात महायुतीकडून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी आज निश्चित झाली. त्यामुळे भाजपमधील काही नेते नाराज आहेत.
याचाच फायदा उठविण्यासाठी महाविकास आघाडीकडून जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांची जयंत पाटील राहुल महाडिक चाचपणी करण्यात आली. महाडिक यांनी दुजोरा दिला आहे.इस्लामपूर – शिराळा मतदारसंघ हातकणंगलेचा निकाल ठरवू शकतो. तरीही महायुतीमधील या भागातील इच्छुकांना संधी दिली नाही. शिंदे गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील हातकणंगले लोकसभा मतदार संघात आपणास उमेदवारी मिळावी यासाठी आपण प्रयत्न केले. परंतु विचार झाला नाही. यामुळेच महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी मला संपर्क केला आहे. – राहुल महाडिक, भाजप नेते माने हे पुन्हा एकदा लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक होते. जागावाटपामध्ये ही जागा शिंदे गटाकडे असल्याने धैर्यशील माने यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे वाळवा व शिराळा तालुक्यातील भाजपमधील इच्छुक