पट्टणकोडोलीत भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे चार चाकी आणि दुचाकी धडकून भीषण अपघात झाला असुन एक जण गंभीर जखमी झाला आहे. येथील कोल्हापूर रस्त्यावर असणान्या माळी पेट्रोल पंपा समोर कोल्हापूरहून येणाऱ्या (एमएच ०९ एफबी १५४७) चारचाकी टाटा टायगर वाहनाचा हुपरीहून कोल्हापूरकडे निघालेल्या स्प्लेंडर (एमएच ०९ एएन ६४९०) या दुचाकी मोटरसायकलीला समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकीस्वार मनोज अशोक घोडके (रा. दत्तवाड, ता. शिरोळ) हे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना प्राथमिक उपचारासाठी पट्टणकोडोली प्राथमिक उपचार केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतर अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी पट्टणकोडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. परंतु पुढील उपचारासाठी जखमीस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितल्यानंतर नातेवाईकांनी सायंकाळी बावडा येथे डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती. सध्या जखमीवर उपचार सुरु असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.