कुंभोज, कुंभोजमधून बुवाचे वाठारला जाणाऱ्या रोडवर सकलासो दर्गा ते परीट कोपरा रोडवर दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले असून सदर परिसरातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी सदर रस्त्यावरील खड्डे मुजवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मुरमाऐवजी शाडूचा थर टाकण्यात आला होता.
संततधार पावसामुळे सदर ठिकाणी दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सदर रस्त्याप्रमाणे कुंभोजमधील बऱ्याचशा रस्त्यावर अशा पद्धतीने दलदलीचे साम्राज्य निर्माण होऊन रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले लवकर मुरूम टाकून रस्त्याची आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या डागडुजी करावी व नागरिकांची वतीने सदर ठिकाणी लवकरात गैरसोय टाळावी अशी विनंती परिसरातील नागरिक करत आहेत.
