हातकणंगले येथील रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणाला गती 

हातकणंगले येथील रेल्वेस्थानकाचे नुतनीकरण वेगाने सुरु आहे. स्वागत कमान यासह दोन्ही बाजूच्या प्लॅटफॉर्मवर निवारा शेड उभारण्याचे काम जोरदार सुरु आहे. हातकणंगले येथील तहसील कार्यालयाच्या दिशेला ये-जा करण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्टेशनच्या मुख्य इमारतीलाही वेगळा लुक देण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रवाशांची कोणतीच गैरसोय होणार नाही. एकुणच रेल्वे स्थानकाचे रुपडे पलटणार असल्यामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.