विटा येथे आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विट्यात घडली. विराज सूर्यकांत निकम (वय १४, रा. जुना वासुंबे रस्ता, विटा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत विटा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रजपूत यांनी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. रविवारी विराज घरातल्या खोलीत होता. बराच वेळ दरवाजा उघडला नाही. घरातील व्यक्तींनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आत लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विटा येथे शाळकरी मुलाची आत्महत्या
