इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांची बदली 

मार्च २०२४ मध्ये इचलकरंजी महानगरपालिकेचे दुसरे उपायुक्त म्हणून प्रसाद काटकर यांनी पदभार स्विकारला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये प्रशासकीय कामकाजामध्ये कामाची चुणूक दाखविली होती. त्यांची बदली पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी करणेत आली आहे. सदर बदलीचे आदेश शासनाच्या अप्पर सचिव अ.का. लक्कस यांनी जाहीर केला आहे. दरम्यान, महानगरपालिकेतील उपायुक्त स्मृती पाटील यांची बदली सांगली महानगरपालिकेकडे झाली असल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात झाली. मात्र, याबाबत अधिकृत बदलीचे आदेश प्राप्त झाले नाही.