आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नुतनीकरणासाठी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर

सध्या इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे सुरु आहेत. रस्ते, वाहतूक, पाणी याबाबतीत असणाऱ्या प्रश्न, समस्या सोडविल्या जात आहेत. इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून याठिकाणी देशभरातील विविध राज्यातून अनेक कुटुंबे उदरनिर्वाहाच्या निमित्ताने स्थायिक झाली आहेत. हे शहर कामगारांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे कामगार आणि झोपडपट्टीवासियांची सं‘या मोठी आहे. या सर्वांना ज्या त्या ठिकाणी आवश्यक त्या आरोग्य सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी शहरात सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहेत.

त्यामध्ये लालबहाद्दुर शास्त्री शाळा क‘. ३४ कलानगर, भारतमाता विद्या मंदिर शाळा क‘. ३३ शाहु पुतळा, हुतात्मा भगतसिंग शाळा क‘. २२ विक‘मनगर, झाकीर हुसेन उर्दु शाळा खंजिरे मळा, वेणुताई विद्या मंदिर हॉल आंबेडकरनगर आणि म्युन्सिपल हॉल जवाहरनगर पोस्ट ऑफिसजवळ यांचा समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ज्या त्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा, औषधोपचार केले जातात. ही प्राथमिक केंद्रे अत्यंत जुनी आहेत. केंद्र सुरु असलेल्या इमारतींची अवस्था जीर्ण झाली असलेने या केंद्रांच्या नुतनीकरणाची गरज होती.या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी माहिती घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींच्या नुतनीकरणासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु केला होता. कामगारांचे शहर व औद्योगिकनगरीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यासह छोटे-छोटे अपघात घडत असलेने तातडीने आरोग्य सुविधांची सातत्याने नितांत गरज भासते. त्यासाठी आवश्यक सुविधांसह आरोग्य केंद्राच्या इमारती सुसज्ज असणे आवश्यक असल्याबद्दल सविस्तर माहिती आमदार आवाडे यांनी दिली.

इचलकरंजी शहरातील विविध भागात असलेल्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुतनीकरणासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून हा निधी मंजूर झाला असून यातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपडे पालटणार आहे.

आमदार आवाडे त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळवून शहरातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नुतनीकरणासाठी ५९ लाखचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून लवकरच या आरोग्य केंद्रांचे रुपडे पालटून त्याठिकाणी आवश्यक सुविधाही उपलब्ध होण्यासासाठी आमदार आवाडे प्रयत्नशील आहेत.