इस्लामपूर येथील विजया सांस्कृतिक भवनमध्ये मऱ्हाठमोळा युवक मंडळाच्यावतीने मराठी नाट्य परिषद आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि मराठा उद्योजक व मार्गदर्शक संतोष पाटील (येलूर) यांना आमदार देशमुख यांच्या हस्ते मराठा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. मराठा युवक कोणत्याही क्षेत्रात कणखरपणे काम करू शकतात. मात्र, त्यांनी आपला उंबरठा ओलांडून बाहेर पडण्याची मानसिकता ठेवायला हवी. मराठा युवकांना त्यांच्या आवडीनुसार कला, उद्योग, व्यवसाय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली.
जगन्नाथ नांगरे यांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताला प्रारंभ झाला. वैभव शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका मांडली. अॅड. धैर्यशील पाटील यांनी महाठमोळा युवक मंडळाच्या गेल्या ३३ वर्षांच्या कामातील अखंड सातत्याबद्दल कौतुक केले. जयराज पाटील यांनी मंडळाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मंडळाचे संचालक शिवराज पाटील यांनी स्वागत केले. प्रा. विजय गायकवाड यांनी परिचय करून दिला. ज्ञानदा पवार यांनी सूत्रसंचालन केले. विजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी संस्थापक सुरेंद्र पाटील, राकेश पाटील, कार्यवाह अभिजीत पाटील, विश्वास पाटील, सुजीत देशमुख, प्रकाश पाटील, संजय पाटील, कालिदास थोरात, उमेश पाटील उपस्थित होते.