सांगोला शहरातील काढलास नका येथील दिशा हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जण आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना सुरु झाली असून याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आव्हान डॉ. सचिन गवळी यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाची ही एक आरोग्य योजना आहे , जी राज्यातील सर्व कुटुंबाना परवडणाऱ्या आरोग्य सेवा पुरवते . या योजनेत , प्रति कुटुंब प्रति वर्षी ५ लाख आरोग्य संरक्षण , तसेच महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते . ही योजना सर्वसमावेशक असून , विविध प्रकारच्या आजारांवर उपचार , शस्त्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय सेवा यांमध्ये मदत करते.
दिशा हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले आरोग्य योजना सुरु
