जागतिक महिला दिनानिमित्त कस्तुरी महिला फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पारंपरिक नृत्य आणि फॅशन शो साठी आई आणि मुलगी अशी थीम होती. विट्यातील महिला भगिनींनी फॅशन शोत सहभागी होऊन आनंद घेतला. या फॅशन शो साठी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या फॅशन शोला पारंपरिक ते आधुनिकतेची झालर लागली होती. अनोख्या अशा नृत्य स्पर्धेचे आयोजन कस्तुरी महिला फाऊंडेशनच्यावतीने प्रथमच करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आई व मुलगी तिथे घेऊन स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महिला विविध वयोगटातील होत्या.
अनेक माताभगिनींनी अशा स्पर्धा कस्तुरी महिला फाऊंडेशनने घेऊन विट्यातील महिलांना एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले. कस्तुरी स्पर्धात्मक विट्यात फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, प्रणिती पाटील, मेघा पाटील व इतर अनेक महिलांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. फॅशन शोमध्ये प्रथम क्रमांक गौरी बोत्रे, द्वितीय सायली कुरकुटे, तृतीय- स्नेहल भिंगारदेवे यांना मिळाला, तर उत्तेजनार्थ देविका दिवटे, सुप्रिया जाधव यांना मिळाले.
वैयक्तिक डान्समध्ये अंकिता कुरकुटे, स्वराली मोहिते, माळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर उत्तेजनार्थमध्ये अक्षता सूर्यवंशी व मनिषा चव्हाण यांनी पुरस्कार मिळवले.