शिवसेना नेते व जिल्हाप्रमुख शिवभक्त रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त पौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना गट पदाधिकारी व शिवभक्त यांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील गिरीदुर्गातील एकमेव मंदिर असलेल्या पन्हाळगडावर शिवछत्रपतींच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. कार्यक्रमास जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर पौर्णिमेस गेली तेरा वर्षे या ठिकाणी मंदिराची स्वच्छता व दुग्धाभिषेक करून शिवछत्रपतींचा जागर केला जातो. यावेळी नियोजक संतोष कांदेकर यांनी, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना शुभेच्छा देवून शिवाजी विद्यापीठचे नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्यासाठी शिवभक्तांनी गरजेचे असल्याचे एकवटणे सांगितले.
रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त पन्हाळगडावर शिवछत्रपतींच्या मूर्तीस अभिषेक
