इचलकरंजी शहर हाणामारी प्रकरणातील जर्मन गँगचा फरारी साहिल हबीब फनिबंद याला ८ महिन्यांनी अटक

इचलकरंजी येथे ८ महिन्यांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यात फरार आरोपी साहिल हबीब फनिबंद, वय २७,रा.रोशन मजीद जवळ, विभुते गल्ली, जवाहरनगर, इचलकरंजी, याला अटक करण्यात आला आहे. तो जर्मन गँगचा सदस्य असून ८ महिन्यांपासून फरारी होता. दरम्यान, साहिल फणीबंद याला तपासासाठी पोलिसांनी कामगार चाळ परिसरात फिरवले. भाड्याने दिलेले चारचाकी वाहन परत न केल्याच्या कारणावरून वादातून आणि पूर्ववैमनस्यातून कामगार चाळ परिसरात १५ जुन रोजी जर्मनी टोळीतील काहीजणांनी शस्त्रास्त्रासह दहशत माजवली होती.

यावेळी एका युवकाला बोलवून त्याला घेराव घालून दमदाटी केली होती. याची कुणकुण लागताच दुसऱ्या जमावाने जर्मनी गँगवर प्रतिहल्ला केल्याने त्यात तिघेजण जखमी झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी स्तवन रामदास आवळे याच्या फिर्यादीनुसार मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शुभम सदाशिव पट्टणकुडे, सचिन उर्फ शाम बाळासो घोरपडे, साहिल हबीब फणीबंद, सुरज सात्ताप्पा पाटील यांच्यासह एका अल्पवयीन मुलासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला होता.

त्यापैकी पट्टणकुडे, घोरपडे व पाटील या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर साहिल फणीबंद हा फरार होता. तब्बल नऊ महिन्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, तपासासाठी त्याला कामगार चळ परिसरात फिरवण्यात आले. ही कारवाई पोलिस निरिक्षक चि पाटील व त्यांच्या पथकाने केली. अधिक तपास पोलिस उपअधिक्षक समिरसिंह साळवे करत आहेत.