पहलगाम आतंकवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानविरूद्ध भारतीय क्रिकेट संघाला सामना खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात येथील उबाठा शिवसेनेच्यावतीने म. गांधी पुतळा चौकात निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करीत सिंदूरची डबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आली.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारे संबंध न ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. मात्र,आज त्यांचा दुटप्पीपणा दिसून आला आहे. केवळ पैशासाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी दिली. त्याचा उबाठा शिवसेनेच्यावतीने जाहीर निषेध करीत असल्याचे वक्तव्य शहर प्रमुख सयाजी चव्हाण यांनी केले. जिल्हाध्यक्ष वैगव उगळे यांनी हॉटेलमध्ये भारत-पाकिस्तान सामना दाखविल्यास हॉटेल फोडण्याचा इशाराही दिला.
या आंदोलनात महेश बोहरा , माळकरी लवटे ,मंगल चव्हाण,शोभा गोरे, संभाजी पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी सहभाग घेतला.
