सांगोला शहरात अज्ञात चोरट्यांनी दोन झेरॉक्स मशीन केल्या लंपास

सांगोला शहरातील कोर्टाच्या जवळील गाड्यांमधून दोन झेरॉक्स मशीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे या बाबत अधिक माहिती अशी की इम्रानखान हुसेन मुल्ला यांचे कोर्टाच्या जवळील पत्रा शेड मध्ये शफा झेरॉक्स नावाचे पत्राचे असुन त्यामध्ये दोन झेरॉक्स मशीन होत्या बुधवार दि. १२ मार्च रोजी सायंकाळी ६: ३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे दुकान बंद करून घरी गेले होते.

नेहमीप्रमाणे गुरुवार दि. १३ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी याचे मित्र चांगदेव गंगथडे यांनी झेरॉक्स दुकान उघडले असता त्यांना दुकानाचे पाठीमागील बाजुचा पत्रा उचकटून दुकानातील दोन शेरॉक्स मशीन चोरीला गेल्याचे दिसल्याने त्यांनी फिर्यादीस कळविले असता लागलीच ते दुकानात गेले व पाहीले आसता त्यांच्या दुकानाचा पाठीमागील पत्रा उचकाटुन दुकानातील दोन झेरॉक्स मशीन चोरुन नेल्याचे दिसल्याने त्यांनी आजुबाजुला शोध घेतला असता झेरॉक्स मशीन मिळून आल्या नाहीत म्हणून घडले प्रकाराबाबत पोलीस ठाणेस तक्रार देण्याकरता आले असता.

चोरीस गेलेल्या झेरॉक्स मशीनचे वर्णन पुढील प्रमाणे २५ हजार रु. किंमती ची एक काळ्या रंगाची क्ससेरा १८०० कंपनीची झेरॉक्स मशीन २० हजार रु. किंमतीची एक पांढ-या रंगाची (२०४०) कंपनीची झेरॉक्स अशा एकूण ४५ हजार रुपये किमतीच्या दोन झेरॉक्स मशीन चोरीला गेल्याची फिर्याद इम्रानखान हुसेन मुल्ला यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिली.