हुतात्मा दूध संघाचे चेअरमन, साखर कारखान्याचे संचालक व शिवसेनेचे वाळवा प्रभारी गौरव नायकवडी यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. या वाढदिवसाच्या निमीत्ताने त्यांना शिवसेना (शिंदे) कडून अनोखी भेट मिळण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना पक्षाकडून त्यांना मोठे पद व जबाबदारी सोपवण्याची शक्यता असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली १३ रोजी गौरव नायकवडी यांचा वाढदिवस झाला. त्यादिवशी अनपेक्षीत कारणाने ते शुभेच्छा स्विकारण्यासाठी वाळव्यात उपस्थित नव्हते.
कार्यकत्यांनी विविध उपक्रम राबवीत वाढदिवस साजरा केला. मात्र त्यादिवशी गौरव नायकवडी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सहकुटूंब दाखल झाले. पत्नी स्नेहल, पुत्र रुद्रनील व कन्या मैथीली यांच्यासह ते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी उपस्थीत होते. शिवसेना व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिष्ठचिंतन करीत राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
