इचलकरंजी येथील आसरानगर बस स्टॉप परिसरात मणीशंकर केसरवाणी यांचे भाड्याच्या इमारतीत कापूस गोदाम आहे. शनिवारी हे गोदाम बंद होते. पण दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोदामातून धुर निघत असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत माहिती केसरवाणी यांना दिल्यानंतर त्यांच्यासह नातेवाईक घटनास्थळी धावून आले. गोदामात पाहणी केली असता आग लागल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी तातडीने महापालिका आणि हातकणंगलेतील अग्निशमन दलास पाचारण केले.
उन्हाचा तडाखा आणि ज्वलनशील असलेल्या कापूस साठ्याला उन्हाचा तडाखा आणि ज्वलनशील असलेल्या कापूस साठ्याला लागलेल्या आगीने बघता बघता रौद्ररुप धारण केले. कापसाचा मोठा साठा असल्याने आग विझवल्यानंतरही उशिरापर्यंत गाठी धुमसतच होत्या. लागलेल्या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले. कामगार आणि भागातील नागरिकांच्या मदतीने कापूस गाठी बाहेर काढण्यात येत होत्या. मात्र गोदामात धुराचे लोट निर्माण झाल्याने मदतकार्यात अडथळा येत होता.
त्यामुळे गोदामाचे पत्रे फोडावे लागले. अग्निशमन दलाचे जवान आणि नागरिकांनी अथक प्रयत्नानंतर ९ बंबांच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. यामध्ये ८० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.