इचलकरंजी नगरीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे हातकणंगले,शिरोळ तालुका तसेच कर्नाटक भागातील नागरिकांसाठी आधारवड बनत आहे सध्या या रुग्णालयाची वाटचाल हि आधुनिकतेकडे चालली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि क्र्सना डायग्नोस्टिक यांच्या सयुंक्त विद्यमानाने सार्वजनिक भागीदारी तत्वावर इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सध्या सिटी स्कॅन सेवा कार्यरत आहे.
दिल्ली येथील नॅशनल अक्रडीशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल या टीमने दि.२६ ऑक्टोबर २०२४ रोजी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास भेट दिली.सदरच्या भेटीमध्ये या टीम रुग्णायातील कार्यरत असणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला तसेच रुग्णालयातील नव्याने कार्यरत असलेल्या सिटी स्कॅन विभागाला भेट देऊन त्या विभागाची तपासणी करून रुग्णांना देत असलेल्या सिटी स्कॅन विभागाला भेट देऊन त्या विभागाची तपासणी करून रुग्णांना देत असलेल्या सेवेचा आढावा घेतला होता.
या झालेल्या तपासणी नंतर दि २३ जानेवारी २०२५ रोजी या सिटी स्कॅन विभागाला हे मानांकन प्रदान करण्यात आले. हे मानांकन उत्कृष्ट आरोग्यसेवा,गुणवत्ता व रुग्ण सुरक्षेच्या उच्चतम निकषांची पूर्तता केल्याचे प्रमाणपत्र असून या प्रमाणपत्राचा कालावधी हा २३ जानेवारी२०२५ पासून २२ जानेवारी २०२९ पर्यत आहे. हे मानांकन प्राप्त करण्यासाठी सिटी स्कॅन विभागातील ऑपरेशन मॅनेजर इजाज मुल्ला,फैझल कन्नूर,अल्ताफ फकीर,श्रीम.सविता कांबळे यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.भाग्यरेखा पाटील मॅडम रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित सोहनी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली.