हातकलंगले तालुक्यातील साजणी येथे नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती मार्फत शहीद दिनानिमित्त शेतामध्ये अनोखे भगवा ध्वज आंदोलन करण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग बाधित आपल्या शेतामध्ये भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून साजणी गावचे सरपंच शिवाजी पाटील यांच्या हस्ते शहिदांच्या फोटोचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा ध्वज उभारण्यात आला व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना सरपंच शिवाजी पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधींनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे अभिवचन दिले होते पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन निवडून आल्यानंतर पुन्हा शक्तिपीठ महामार्ग होणार असे सांगत आहेत.
ते जनतेची फसवणूक करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांचा सन्मान केला पण हे राज्यकर्ते शेतकऱ्याचे आयुष्य उध्वस्त करून हा महामार्ग करत आहेत पण हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी शेतकन्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचे आश्वासन दिले.यावेळी सर्व बाधित शेतकन्यांनी आपल्या वावरामध्ये भगवा ध्वज उभा करून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, जमिन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द अशा घोषणा देण्यात आल्या. सुरुवातीस के. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले व माजी सरपंच जंबुकुमार चौगुले यांनी आभार मानले.