कोल्हापूरआणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कसबा-बावडा येथील रमणमाळा येथे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी राजाराम तलाव येथे पार पडणार आहे.निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियोजन बैठक आढावा घेत सर्वांना दहा दिवस अगोदर तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतमोजणी वेळी उष्णता, उकाडा आणि पावसाचा अंदाज घेऊनच संपूर्ण तयारी करा, अशा सूचना ही देण्यात आल्या आहेत.
4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात दोन्ही लोकसभा मतदारसंघातील नोडल अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतमोजणीवेळी उकाडा, पाऊस आदीबाबत विचार करून नियोजन करा. मतमोजणीसाठी नेमलेले अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या. तयारीसाठी आपल्याकडे दहा दिवस आहेत. परंतू सर्व कामे 25 मे पर्यंत पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.