नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दारू दुकाने 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी उशिरापर्यंत सुरू ठेवता येतील आणि नव्या वर्षी पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यपींना चिअर्स करता येणार आहे.
बीअर बार आणि परमिट रूम यांना पहाटे पाच वाजेपर्यंत आणि काही इतर काही श्रेणीतील दुकानांना रात्री एक पर्यंत उघडे ठेवण्याची अनुमती राज्य सरकारने दिली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचा हा प्रस्ताव गृह विभागाने मंजूर केला आहे. (Thirty First December)दारूची दुकाने रात्री 10.30 ते दुसर्या दिवशी पहाटे एक पर्यंत उघडे ठेवता येतील.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आणि हद्दीबाहेरील दारूची दुकानेही रात्री 11.30 ते दुसर्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत उघडे ठेवता येणार आहेत. देशी दारूची विक्री करणार्या सीएल-3 ही अनुज्ञप्ती असणारी दुकाने महापालिका तसेच अ, ब वर्ग पालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसर्या दिवशी पहाटे 1 पर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसर्या दिवशी पहाटे 1पर्यंत उघडे ठेवता येतील.