गेल्या काही दिवसांपासून हवेत कमालीचा उष्मा निर्माण झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच सोमवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण होवून सायंकाळनंतर इचलकरंजी आणि हातकणंगले परिसरात अवकाळी पावसाची हजेरी लागली. त्यामुळे काही प्रमाणात हवेतील उष्मा कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पण रात्रीनंतर पुन्हा हवेत उष्मा वाढल्याने नागरिकांचा जीव बेजार झाला होता. त्यातच अवकाळी पावसाने शेतातील आंबे व अन्य पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे.
