इचलकरंजी येथील जांभळे, गैबान गटाचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राजाराम स्टेडीयममधील कार्यालयास भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुर्लेकर मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी, कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची पूर्वीपासून ताकद आहे. पण ती भविष्यात आणखीन वाढावी यासाठी सर्वांनी मिळून पक्ष संघटन मजबूत करुया. केवळ मी भाषणात सांगितले म्हणून ते होणार नसून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करुया आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विचारांचे सर्वाधिक आमदार आणुया.

पक्षात येणाऱ्यांना सन्मान देताना जुन्यांवर अन्याय होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल. त्यासाठी सर्वांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचाव्यात, असे आवाहन केले. लाडक्या बहिणींच्या पाठबळावर महायुतीचे सरकार सत्तेत आले. लाडकी बहिण योजना बंद होणार असा कांगावा विरोधक करत आहेत. या योजनेसाठी अर्थसंकल्पात वार्षिक ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. परंतु ती योजना कदापि बंद होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

इचलकरंजी येथील माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्यासह त्यांच्या गटाने तसेच माजी नगरसेवक लतिफ गैवान, परवेझ गैवान यांचेसह त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राष्ट्रवादी पक्षाला आणखी चळकटी मिळाली आहे. सुहास जांभळे, लतिफ गैवान यांचे उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना अजितदादांनी अशोकराव जांभळे हे माझे जुने सहकारी असून पक्ष वाढीसाठी निश्चितच त्यांचा उपयोग होणार आहे.

यावेळी अजित पवारांनी इचलकरजीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची जबाबदारी अशोकराव जांभळे यांचेवर सोपविली. यावेळी अमित गाताडे, शिवाजी शिंदे, दशरथ माने, नासीर अपराध, अजित एकार, रमेश कांबळे, अमोल भाटले, प्रवीण खाडे, गुड्डु शेख, फैय्याज बागेवाडी, सुरेंद्र सपकाळ आदी उपस्थित होते.