कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्याकडून यशस्वी प्रयत्न झालेत. भविष्यात लवकरच कोल्हापुरात दीड लाख स्क्वेअर फुट बांधकामाचे परवानगी पूर्ण होणार आहे त्यासाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून नियोजन करण्यात येत आहे. याबाबत आर्किटेक्चर कोल्हापूर खेरडाळी यांची बैठक सुद्धा बोलवण्यात आले आहे. आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह पदाधिकारी यांची सुद्धा बैठक झाली आहे .
भविष्यात बांधकाम करणाऱ्या नागरिकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. आहे त्या पाईपलाईन मधूनपाणी पुरवण्यासाठी अडचणी निर्माणहोणार आहेत. भविष्यातील अडचणी लक्षात घेता आताच महानगरपालिकेने योग्य नियोजन केले तर त्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
याबाबत आमदार पाटील यांनी योग्य नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. पिण्याच्या पाण्यासह आरोग्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होऊ नये म्हणून तज्ञ लोकांना एकत्र करत भविष्यात सुद्धा बैठक घेणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितलं, नेत्रदीप सरनोबत यांनाही आतापर्यंत ९० लाख स्क्वेअर फुट बांधकामासाठी परवानगी पूर्णे आहेत.
येत्या सहा महिन्यात अजून ५० लाख परवानगीसाठी अर्ज येणार आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करता एक टास्क तयार करण्यात येणार आहे. २०३० पर्यंत दीड कोटी सकेअर फुट बांधकामे परवानगी येणार आहेत. असे पाटील यांनी सांगितले.