Kavya Maran ची रडण्यासारखी हालत, ज्याला धुडकावलं त्याने लक्षात राहील असा बदला घेतला

काव्या मारनला अपेक्षा होती की, तिची टीम सनरायजर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्सचा दारुण पराभव केल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध असाच दमदार विजय मिळवेल. पण हैदराबादमध्ये झालेल्या या सामन्यात बिल्कुल उलट झालं. SRH ने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या. LSG ने हे लक्ष्य अवघ्या 16.1 ओव्हर्समध्ये पार केलं. काव्या मारनने ज्याला धुडकावलेलं, त्या फलंदाजाने हैदराबादला हरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या फलंदाजाच नाव आहे, निकोलस पूरन. त्याच्या तुफानी इनिंगमुळे हैदराबाद टीमची मालकीण काव्या मारनची रडण्यासारखी हालत झालेली. स्टेडियममधले तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काव्या मारनला अपेक्षा होती की, तिचे गोलंदाज 191 धावांच्या टार्गेटचा बचाव करतील. पण असं झालं नाही. निकोलस पूरनने तिच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. पूरन दुसऱ्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मैदानात पाऊल ठेवताच त्याने चौकार-षटकारांची बरसात केली. मैदानावर त्याने चौफेर फटकेबाजी केली. त्याची बॅटिंग पाहून काव्या मारनच्या चेहऱ्यावर उदासी, हाताशा, निराशा स्पष्ट दिसत होती. असं वाटत होतं की, जणू ती आता रडणार. अनेक फॅन्सनी तिचे स्टेडियममध्ये फोटो शेअर केलेत.

इतक्या चांगल्या प्रदर्शनानंतरही धुडकावलं

निकोलस पूरनने 2019 साली पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये डेब्यु केला. तीन सीजन खेळल्यानंतर 2022 साली काव्या मारनने 10.75 कोटी रुपये मोजून पूरनला सनरायजर्स हैदराबादसोबत जोडलं. पूरनने SRH कडून खेळताना 14 सामन्यात 144 च्या स्ट्राइक रेटने 306 धावा केल्या. इतकं चांगल प्रदर्शन करुनही 2023 च्या सीजनमध्ये त्याला धुडकावलं. त्यावेळी लखनऊ सुपर जायंट्सने निकोलस पूरनला विकत घेतलं. आता हैदराबाद विरुद्ध त्याने 269 च्या स्ट्राइक रेटने 26 चेंडूत दमदार 70 धावा ठोकून आपला बदला घेतला.