नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आम. राहुल आवाडे तसेच शिरोळ विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर हे प्रचंड मतांनी निवडून आले आणि त्यांनी आमदारकीचा मान मिळवला. तसेच महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी मा. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची निवड झाली आहे. यामुळे दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने रविवारी म्हणजेच 29 डिसेंबरला श्री अतिशय क्षेत्र कुंजवन उदगाव येथे भव्य जाहीर सत्कार सोहळा सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा. भालचंद्र पाटील यांनी केले आहे.
रविवारी दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन…..
