सांगोला तालुक्यातील वाकी- शिवणे येथे दारू,जुगार,मटका व गुटखा अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आह. या अवैध धंदयामुळे शाळकरी मुले मुली महिला वर्गाना त्रास होत असल्याने अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्याकडे केली आहे. त्याच अनुषगाने सांगोला पोलीस स्टेशनचे भिमराव खणदाळे अक्शन मोडवर येऊन त्यांनी आपल्या कर्मचाऱ्या समवेत वाकी शिवणे येथे चालणाऱ्या सर्व अवैध व्यवसावर कारवाईचा बडगा उचलला परंतु अवैध व्यवसाय धारकांनी चक्क सरपंचास धमकी देत धमकीचे कॉल रेकॉर्ड ग्रुपवर व्हायरल केले आहेत.
दि. २४-०३-२०२५ रोजी सकाळी ९:१३ मिनिटांनी भास्कर विठ्ठल शिंदे, धूळा विठ्ठल शिंदे, विठ्ठल दगडू शिंदे, सागर अशोक कोळेकर, या सर्वांनी मिळून तुम्हाला बघून घेईन व तुमचा परळी (बीड) सारखा खून केल्याशिवाय शांत बसणार नाही अश्या स्वरुपाची धमकी देऊन धक्काबुक्की केली. यांच्याबरोबरच अजित बुचडे निलेश होवाळ, सुनील चव्हाण, सागर हेगडे, सुंदर काटे, हिरा सुनार, सागर अशोक कोळेकर हे सर्वजण मिळून वारंवार माझा रात्री अपरात्री पाटलाग करीत आहेत.
हि बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून त्यांचेवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी कार्यवाही न झाल्यास याचा निषेध म्हणून बेमुदत वाकी शिवणे गाव हे बंद ठेवण्याचा निर्णय वाकी शिवणे ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात येईल अशा स्वरूपाचे निवेदन सांगोला पोलिस स्टेशन चे निरीक्षक भिमराव खणदाळे यांना देण्यात आले.