पंढरपूर येथे अवैध वाळू उपसा करणारे तराफे केले नष्ट 

पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक केली जात आहे. त्याबद्दल अनेक वेळा तक्रारी येत असल्याने महसूल प्रशासन सतर्क झाले आणि त्यांनी अचानक कारवाई करत पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करताना लागणाऱ्या तीन तराफा नष्ट करून जाळल्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर नजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये आसबे मळा येथे असणाऱ्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी कारवाईसाठी महसूल प्रशासनाचे पथक पाठवण्यात आले.

गोपाळपूर येथील आसबे माळा येथे दिवस रात्र अवैधरित्या वाळूचे वाहतूक व उपसा होत असल्याने या ठिकाणी कारवाईसाठी पथक गेल्यावर अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ थरर्माकोल तराफा नष्ट करण्यात आल्या आहेत.