विटा पोलिसांकडून दोन अट्टल दुचाकीचोर गजाआड; दहा मोटरसायकली जप्त

विट्यासह आटपाडी, कडेगांव, कासेगांव सातारा शहर, तळबीड, हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल मोटरसायकल चोरीचे १० गुन्हे उघडकीस आणून दोन मोटरसायकल चोरट्यांना पकडण्यात विटा पोलिसांना यश आले आहे. प्रितम सदाशिव शिंदे आणि बादल अब्दुल पिरजादे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे पावणेचार लाख रुपये किंमतीच्या एकूण १० मोटरसायकली जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली.

प्रीतम शिंदे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विटा, आटपाडी, कासेगाव, हातकणंगले आणि तळबीड येथील पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत असे निष्पन्न झाले. या सर्व गुन्ह्यांची कबुली त्याने दिली असून तो मोटरसायकल चोरून विट्यातील बर्वे मळा येथे राहणाऱ्या बादल पिरजादे यास विक्री करीत असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील बादल पिरजादे यास परवाच विटा पोलिसांनी ड्रग्जची अर्थात नशेची इंजेक्शन्स विक्रीप्रकरणी केलेली आहे.