आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सोलापुरात झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आमदार रोहित पवार असल्याचे उघड होत आहे. बहुजन समाजातील आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नेतृत्व संपवण्यासाठी खालच्या करणाऱ्या पातळीचे राजकारण आमदार रोहित पवार व त्यांच्या समर्थकांचा निषेधार्थ हे जोडोमार आंदोलन करण्यात आले. गुरुवारी विट्यातील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी व तीव्र निदर्शने करत परिसर दणाणून सोडला आणि आ. रोहित पवार यांच्या पोस्टरला जोडोमारो आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद भारते, विद्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश पाटील, सुधाकर शिरतोडे, माणिक शिंदे, राहुल मंडले, करण जाधव, प्रथमेश साळुंखे, अक्षय मोहिते, सोमराय तुंबगी, शशिकांत मस्के, महादेव साठे, सुभाष लांडगे, राहुल सकट, मुकेश पंडित यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
