सुहास भैयांना पहिल्याच प्रयत्नात नागरिकांची साथ

बहुचर्चित व लक्षवेधी ठरलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात सर्व अंदाज ठरवत महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार सुहास अनिल भाऊ बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांच्यावर 77 हजार 928 मतांनी मात करत विजय मिळवला. या विजयानंतर आटपाडी तालुक्यातील आमदार सुहास बाबर यांचे बॅनर व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आटपाडी सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते सुहास बाबर यांना निवडणूक आणणे म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना खरी श्रद्धांजली असे त्यांचे प्रमाणे नागरिकांनी त्यांची साथ दिली.

शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर हे विजयी झाल्याची घोषणा एकटाच कार्यकर्त्यांनी आटपाडी शहरात मिरवणूक काढून गुलालाची उधळण केली. सुहास बाबर यांचा हा विजय स्वर्गीय अनिल भाऊ यांनी केलेले कार्य टेंभूचा सहाव्या टप्पा, लाडकी बहीण योजनेचे फलित आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सुहास बाबर यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. विरोधकावर फारशी ठिकाणी करता विकास कामावर त्यांनी भर दिला होता. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुहास बाबर हे आघाडीवर होते. विटा शहरात मिळालेल्या मताधिक्याने त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.