कारंदवाडी येथील सांगली – इस्लामपूर रस्त्यावर असणाऱ्या वाडकर-मुलाणी -आवटी हा पाणंद रस्ता गेली ५० वर्षांपासून बंद होता. येथील शेतकऱ्यांनी रस्ताखुला करण्यासाठी महसूल प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार १ किलोमीटर असलेला हा पाणंद रस्ता शासन निर्णयानुसार आणि उपविभागीय अधिकारी निवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तडजोडीने आणि महसूल प्रशासनाच्या सहकार्याने खुला करण्यात आला.
कारंदवाडी आणि परिसरात तहसिलदार राजशेखर लिंबारे यांच्याहस्ते रस्त्याचे भूमिपूजन बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. येथील गट क्रमांक ३०५/६, ३०३/३/३१ आणि ३०४/१अ / २ / २अ / २ब / १ यामधून जाणारा रस्ता सुरेश वाडकर आणि जितेंद्र वाडकर या शेतकऱ्यांनी एक पाऊल मागे घेत अप्पर तहसिलदार, महसूल अधिकारी, सरपंच आणि गावातील पंच यांचे ऐकत तडजोड केल्याने पूर्णत्वास गेला. आष्टा तहसील कार्यालय येथील अप्पर तहसिलदार राजशेखर लिंबारे यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.