हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. सरत्या वर्षाला निरोप देऊन उगवत्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करायचचे. मोठ्या उत्साहात या दिवशी मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. याच सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते.
या सणाच्या निमित्ताने घरोघरी उंचच उंच गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. या वर्षी गुढीपाडव्याचा सण ३० मार्च २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक मराठी घरामध्ये गुढी उभारून स्वादिष्ट अन्नपदार्थ, गोडधोड बनवून कुटुंबासह या सणाचा आनंद घेतला जातो. दाराबाहेर सुंदर फुलांचे तोरण, रांगोळी काढली जाते. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय, उत्साही वातावरण पाहायला मिळते.
दुःख सारे विसरून जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा…!!!