आष्टा शहरात नियमितपणे मुद्रांक विक्री करण्याचे आदेश; एम. एन. गुरव

आष्टा शहरात नियमितपणे मुद्रांकची विक्री केली जात होती. त्यामुळे नागरिकांतून वारंवार तक्रार येत होती. त्याचा त्रास नागरिकनाशन करावा लागत होता . त्यामुळे आष्टा शहरातील नागरिकांना वेळेवर मुद्रांक मिळावेत, यासाठी दुय्यम निबंधक एम. एन. गुरव यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लीगल सेलतर्फे आवाज उठवल्यानंतर प्रत्येकाला ठरवून दिलेली वार पद्धत बंद करून नियमितपणे प्रत्येकाने मुद्रांक विक्रीचे आदेश एम. एन. गुरव यांनी दिले. आष्टा दुय्यम निबंधक कार्यालयात अँड. अभिजीत वग्यानी, अशोक मदने, गुंडाभाऊ आवटी, सुरेश कुंभार यांच्यासह मुद्रांक विक्रेते डी. बी. पाटील, पी. एम. पाटील, अॅड. प्रसाद माने पवार यांच्यासह सर्व मुद्रांक विक्रेते यांची बैठक झाली.

आष्टा दुय्यम निबंधक कार्यालयांतर्गत आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, बागणी, गोटखिंड वाळवा, कोरेगाव, नागाव, पोखरणी, ढवळी यासह वाळवा तालुक्यातील पूर्व भागातील २२ गावांतील खरेदी-विक्रीचे तसेच बँका, पतसंस्थांचे व्यवहार होतात. आष्टा शहरात चार तर वाळवा बावची याठिकाणी एक मुद्रांक विक्रेता आहे. त्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच मागणी होत आहे. नियमितप मुद्रांक विक्री करावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे.