आष्ट्यात आजपासून एकवीरा देवी महोत्सव

वाळवा तालुक्यातील आष्टा येथील श्री एकविरा देवी महोत्सवानिमित्त आज शनिवार ९ नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर अखेर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. श्री एकविरा देवी महोत्सवानिमित्त नऊ नोव्हेंबर पासून प्रकाश महाजन व प्रमोद साळुंखे यांचे ज्ञानेश्वरी पारायण वाचन, दुपारी तीन ते पाच या वेळेत भजन आहे.

दररोज रात्री नऊ ते 11 कीर्तन, व्याख्यान व मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. नऊ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता डॉ. विनोद बाबर यांचे व्याख्यान, 10 नोव्हेंबर रोजी वीरेंद्र केंदळे यांचा हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम, 11 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता समडोळी येथील महिला मंडळांचा महिला आरोग्य व सबलीकरण याविषयी कार्यक्रम, रात्री नऊ वाजता बाल कीर्तनकार विठ्ठल महाराज करांडे यांचे कीर्तन, 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गुंड व पोत्यांचे मैदान तसेच रात्री नऊ वाजता हभप सुरेश कदम यांचे प्रवचन,

१३ नोव्हेंबर रोजी मंगळागौरी पारंपारिक खेळ तसेच रात्री नऊ वाजता सावकार गुरुजी यांचे कीर्तन व 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता तुलसी विवाह, रात्री नऊ वाजता विठ्ठल गावडे महाराज यांचे कीर्तन, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव व 16 नोव्हेंबर रोजी महाप्रसाद आहे.