सांगोल्यात कोसळले संशोधनासाठी सोडलेले पॅराशूट; चारचाकी वाहनाचे नुकसान

२९ मार्चला रात्री ९ वाजता हैदराबाद येथून संशोधनासाठी आकाशात पॅराशूट सोडण्यात आले होते. टाटा इन्स्टा परर्नामेंट कंपनीचे ताऱ्यांच्या संशोधनासाठी हे पॅराशूट साधारण ३२ किलोमीटर उंचीवर जाते आणि त्याचा अभ्यास एका दिवसासाठी केला जातो. संशोधन पूर्ण झाल्यानंतर पॅराशूट नियोजित ठिकाणी खाली उतरवले जाते. तसेच सांगोला परिसरातील खारटवाडी येथे हे पॅराशूट उतरवण्याचा प्रयत्न केला जात होता.

मात्र, वाऱ्याच्या अनपेक्षित प्रवाहामुळे ते सांगोल्याच्या दिशेने वळले आणि शेवटी खडतरी गल्लीतील एका चारचाकी वाहनावर कोसळले. या पॅराशूटशी संबंधित बलूनचा काही भाग विजेच्या तारेवर अडकला. तसेच शहरातील नागरिकांमध्ये या घटनाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.