खानापूर विधानसभा मतदारसंघाची ही जागा महाविकास आघाडीने जिंकायची, यासाठी वैभव पाटील यांना ऐनवेळेला निवडणूक रिंगणात उतरवले. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना आदेश दिले. परंतु कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाला कात्रजचा घाट दाखवत सुहास बाबर यांच्या पाठीशी राहून मोठ्या मताधिक्यांनी त्यांना निवडून आणले. सुहास बाबर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी पाटणचे आमदार शंभूराज देसाई आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देसाई म्हणाले होते, सुहास बाबर हे शंभर टक्के निवडून येणार आहेत. निवडून आल्यानंतर त्यांना घेऊन मी कराडमार्गे मुंबई जाणार आहेत. देसाई यांचा शब्द खरा झाला. खानापूर विधानसभा मतदारसंघ २०२४ ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. ते कारण असे की, महायुतीचे सुहास बाबर यांंना मिळालेल्या मताधिक्याने मतदारसंघात नवा विक्रम प्रस्थापित केला.
Related Posts
खानापूर मतदारसंघातील विकास कामांना गती….
खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांच्या पश्चातही या मतदार संघातील विकास कामांना प्राधान्याने…
खानापूर मतदारसंघात बाबर- पाटील गटात जोरदार चढाओढ….
खानापूर मतदारसंघातील पाटील आणि बाबर गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून बाबर गटाबरोबर आता पाटील गटाने देखील गावागावात जोरदार…
खानापूरमध्ये दोन माजी आमदार पुत्रांमधील लढत चुरशीची
खानापूर मतदारसंघामध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीत दोन माजी आमदारपुत्रांचा एका माजी आमदारांशी सामना अंतिम टप्प्यात रंगतदार बनला आहे. या मतदारसंघामध्ये…