आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक गटात रणनीती आखण्याची सध्या जोरदार सुरुवात झालेली आहे. उमेदवारीसाठी देखील तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. अशातच सांगली जिल्ह्यामधील वाळवा इस्लामपूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला. या ठिकाणी जयंत पाटलांना घेरण्यासाठी भाजपने विशेषत देवेंद्र फडणवीसांनी वेगळी रणनीती आखली आहे. त्यामुळे जयंत पाटलांविरोधात एकाच उमेदवार असेल यासाठी प्रयत्न सुरु आहे.
गेल्या वेळी भाजपकडून लढलेले इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील या वेळीदेखील इच्छुक आहेत. तसेच शिंदे गटात असलेले गौरव नायकवडी हेदेखील या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सध्यातरी जयंत पाटलांचं पारडं जड असल्याचं चित्र आहे.