इस्लामपुरातील सिद्धनाथ मंदिर परिसरातील पाटील गल्लीतील या ‘पिस्त्याचा गणपती’ची सर्वत्र चर्चा

यंदाच्या गणेशोत्सवात विविध रुपातील, रंगातील, आकारातील बाप्पाच्या मूर्ती आपण पाहतोय. आगमनापासून विसर्जनापर्यंतचा विविध रंगी थाटही पाहतोय. यातच सांगलीच्या इस्लामपूर शहरातील तरुणांनी रासायनिक रंगांना फाटा देत पिस्त्याचा वापर करून बाप्पाचे विलोभनीय रूप साकारले आहे.”प्रत्येक वर्षी इतरांपेक्षा वेगळी गणेश मूर्ती साकारण्याचा आमचा प्रयत्न असतो. यापूर्वी आम्ही काजू -बदाम पासून मूर्ती तयार केली होती. यंदा पिस्त्यापासून साकारली आहे. यामध्ये कोणतेही रासायनिक रंग वापरले नाहीत. मंडळातील 8 कार्यकर्त्यांनी अवघ्या 2 दिवसात मूर्ती तयार केली,”, असे या मंडळाचे सदस्य राज पाटील यांनी सांगितले.मूर्ती साकारताना वापरलेल्या 5 किलो पिस्त्याचा जलचरांना खाद्य म्हणून उपयोग होईल. तर सजावटीसाठी वापरलेले मूठभर खडे आणि मोती कार्यकर्ते विसर्जनापूर्वी काढून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाच्या दृष्टीने मूर्ती बनवल्यामुळे उरूण इस्लामपुरातील सिद्धनाथ मंदिर परिसरातील पाटील गल्लीतील या ‘पिस्त्याचा गणपती’ची सर्वत्र चर्चा होत आहे.