इस्लामपूर शहरात पावसाच्या पाण्याने गटारी तुंबून पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतुकीस अडथळा येत आहे त्यामुळे अपघात होत आहेत, हे सर्व प्रश्न सोडवावेत, असे निवेदन इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना देण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी हे निवेदन दिले.
नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने तातडीने लक्ष घालावे. शहरातील रस्त्या वरील खड्डे मुजवून वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरातील रस्त्याच्या बाजूच्या खांबावरील बंद दिवे सुरू करण्यासाठी संबंधित विभागास कडक सूचना कराव्यात, असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी दिग्विजय पाटील, सचिन कोळी, शकील जमादार, गंगाराम शिंगाडे, अंकुश जाधव उपस्थित होते.
